अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात २.३० च्या सुमारास एक ३३ वर्षाची तरुण महिला तिच्या घरासमोर धुणे घुत असताना तेथे आरोपी सुनील जनार्दन खैरे, दीपक विनय पाटील हे आले व ते महिलेस म्हणाले की, तू मागे आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे, असे म्हणत महिलेस धरुन तिच्या अंगावरील गाऊन फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.
तुला खाली पाडून तुझ्यावर बलात्कार करतो, असे म्हणत आरोपींनी महिलेस घेरले असता ती आरोपींच्या तावडीतून सुटका करुन घरात पळाली. तेव्हा आरोपी सुनील खैरे, दीपक पाटील तसेच करुणा खैरे,
व मीरा पाटील यांनी घरी येवुन हातात लाकडी दांडका घेवून घराच्या दरवाजावर मारून घराचा पडदा फाडला. शिवांगाळ करुन घरातील तुझ्या सर्व लोकांना व मुलांना खून करुन पारू,
अशी धमकी दिली. प्रचंड भेदरलेल्या पिडीत महिलेने थेट नातेवाईकांच्या मदतीने श्रीशनिर्शिंगणापूर पोलीस स्टेशनला जावुन वरीलप्रमाणे फिर्याद देवून आरोपी सुनील जनार्दन खैरे, दीपक विनायक पाटील, करुणा जनार्दन खैरे,
मीरा विनायक पाटील सर्व रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आता असून सपोनि बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली. हेका माळवे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.