धक्कादायक : रुग्णालयात असलेले दोघे करोना बाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसोबतच मनपा, जिल्हा परिषद,

राजकारणी आणि पोलिसांनाही कोरोनाने शिकार बनविल्यानंतर आता रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारीही बाधित झाल्याचे समोर आले आहे.

प्रवरा रुग्णालयात सेवेत असलेले दोघे जण करोना बाधित आढळून आले असून त्यात लोणी खुर्द येथील परिचारिका व दाढ बुद्रुक येथील व्यक्तीचा समावेश आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात प्रवरा रुग्णालयातील एक परिचारिका करोना बाधित आढळून आली. दरम्यान या परिचारीकेच्या कुटुंबातील चार जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

परीचारिकेचा पतीही याच रुग्णालयात नोकरीत असून त्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दाढ बुद्रुक येथील रहिवाशी असलेली

एक व्यक्ती प्रवरा रुग्णालयात नोकरीस असून ती सोमवारी बाधित आढळून आली. या व्यक्तीच्या कुटुंबातील पाच जणांच्या घशातील स्राव आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी घेतले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24