अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- सध्या जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे व अजूनही काही ठिकाणी पडत आहे. त्यामुळे ओढे,नदी ओसंडून वाहत आहेत तर नाले, पाझर तलाव, धरणं तुडूंब भरली आहेत.
अनेकदा ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त आशा ठिकाणी जात असतात.त्यामुळे प्रशासनाने आशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये असे आवाहन केले आहे.
मात्र तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशी घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. यात एक २७ वर्षीय महिला कपडे धुण्यास गेली असता ती वाहून गेल्याची घटना शनिवारी दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली आहे.
याबाबत घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी म्हटले आहे,
की नेवासा शहराच्या नागझिरी परिसरातील २७ वर्षीय रोहिणी रमेश घुगे (रा. मक्तापूर) ही नागझिरीलगत असलेल्या ओढ्यात कपडे धुण्यासाठी आली होती. मात्र या दरम्यान ती वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान बचाव पथकाच्या मदतीने पोलीस तिचा शोध घेत आहेत.