धक्कादायक ! तलवारीने हल्ला करणाऱ्या तरुणास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-शिवजयंती दिवशी कोपरगाव शहरात एका तरुणाने हातात तलवार घेऊन धिंगाणा केल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

भगवा चौक ते कन्या शाळा दरम्यान या तरुणाने धिंगाणा घातला. दरम्यान तलवार घेऊन असलेला हा माथेफिरू तरुण प्रत्येकाला मारण्याचा प्रयत्न करीत होता.

या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. आकाश नारायण कुळधरण वय २४ रा. कोपरगाव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरभर शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा झाला. सगळीकडे भगवे झेंडे व पताका यामुळे शिवमय वातावरण झाले होते.

सकाळी १० वाजता अचानक भगवा वेश, दाढी वाढलेला एक तरुण भगवा चौकातून प्रकट झाला. त्याच्या हातात तलवार होती. तो सुसाट निघाला त्याच्या मागे त्याची आई व बहिण होती.

हा युवक तलवारीचा धाक दाखवत अंगावर धावून येऊन तलवारीने मारण्याचा प्रयत्न करीत होता. एक युवक स्कूटरवरून जात असताना त्याच्या अंगावर तलवार मारली.

यात तो चालक जखमी झाला. यानंतर दोघे तिघे मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्यावर देखील तलवारीने वार करत होता.

तो शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हातात तलवार घेऊन आरडाओरडा करत होता. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले. शांतता भंग प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24