अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- शहरातील शहाजी रस्त्यावर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
तसेच या टोळक्याने एका दुकानावर दगडफेक करत दुकानदारास लाेखंडी पाइप व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी काेतवाली पाेलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला अाहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दुकानदार अशन अंजुम तांबटकर हे दुपारी १ ते २ च्या दुरम्यान भावासह दुकानात हाेते. यावेळी वसीम जमशेद शेख (बुरुडगाव रस्ता), अफनान समीर शेख (मुकुंदनगर), वसीमचा मामा लाला अाणि त्यांच्या साेबत अालेले १५ ते २० जण दुकानात अाले.
शिवीगाळ करत त्यांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकले. दाेन्ही भावांना लाेखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर जमावाने दुकानावर दगडफेक केली. जमावाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.