करोना लस घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा अल्प प्रतिसाद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शुक्रवारी नगर महापालिका हद्दीतील आठ व जिल्हा सामान्य रूग्णालयासह जिल्ह्यातील 16 केंद्रावर 1 हजार 970 आरोग्य कर्मचार्‍यांना करोनाची लस देण्यात आली. आतापर्यंत 17 हजार 320 कर्मचार्‍यांना करोनाची लस देण्यात आली आहे.

शुक्रवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी स्वत: ही लस घेतली. दरम्यान जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्याला सीरमच्या कोव्हिशील्डचे पहिल्या टप्प्यात 32 हजार तर दुसर्‍या टप्प्यात 30 हजार डोस मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यातील या लसीकरणात ही लस आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार आदींनी दिली जात आहे.

सुरूवातील जिल्ह्यातील आठ व मनपा हद्दीतील चार केंद्रावर करोनाची लस दिली जात होती. यामध्ये वाढ करून जिल्ह्यातील 16 व मनपा हद्दीतील आठ केंद्रावर करोना लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान करोना लस घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24