अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बऱ्याच वर्षानंतर जिल्ह्यात चांगला व समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे यंदा बळीराजा खूष झाला आहे. तर काही ठिकाणी अती पाऊसामुळे अनेक ठिकाणी खरीपाची व आता रब्बीची पीके सुद्धा वाया गेली आहेत.
नुकताच पाऊस काही दिवसांपासून उघडल्या नंतर शेतक-यांनी कांदा, गहू व हरभरा आदी उशीरा करता येणारी पीके घेण्याकडे वळले आहेत. मात्र सुरूवातीच्या काळात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे कांदा रोपे खराब झाली तसेच कांदा बियाणांची टंचाई निर्माण झाकी आहे.
याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून अवाजवी दराने कांदा बियाणांची विक्री केली जात आहे. सुमारे एक हजारते दीड हजार रूपये किलो मिळाणारे कांदा बियाणे थेट चार हजार रूपये किलो दराने विकले जात आहे. तर काही ठिकाणी बोगस बियणेही विकली गेली आहेत.
बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून कांदा गहू व हरभरा पेरणीकडे कल वाढवला आहे. आता गहू बियाणाची कृत्रीम टंचाई व्यापारी व कंपण्या करत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना चढ्या भावाने गहू बीयाणे खरेदी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.
किंमतीपेक्षा शंभर ते दीडशे रूपये कमी दराने मिळाणारी गहू बियाणाची पिशवी अता त्यावर छापलेल्या किंमतीस किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीस घ्यावी लागत आहे. कंपणी व वितरकांनी जाणिवपुर्वक कमी बियाणे बाजारात आणली आहेत व कृत्रीम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतक-यांची लुबाडणुक होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved