पाईपलाईन फुटल्याने केला गोळीबारअन महिलेला दिली जीवे मारण्याची धमकी …?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पाईपलाइन फोडल्याच्या किरकोळ कारणावरून घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय सिताराम रासकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील चास येथील संजय याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पद्माबाई संतोष रासकर यांच्या घरासमोर येऊन पाइपलाइन फोडल्याच्या कारणांवरून शिवीगाळ केली.

तसेच संजय याने त्याचा भाऊ महादेव सिताराम रासकर याच्या नावाने लायसन्स असलेली बंदुक सोबत आणली होती. दहशत करण्याच्या उद्देशाने संजय याने बंदुकीतून पद्माबाई यांच्या घरासमोरील झाडात गोळीबार केला.

‘तुम्ही जर आमची परत पाइपलाइन फोडली तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू’, अशी धमकी दिली. दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.