भाविकांविना श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सवास सुरवात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या पौष महिन्याच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सवास सुरवात झाली आहे.

दरम्यान आज निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व पत्नी सौ. शीतल निश्चित यांच्या हस्ते मंदिरात महापूजा आरती करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी निचित यांनी मंदिर परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यात्रा काळात खंडोबा मंदिर दर्शनासाठी १९ जानेवारीपर्यंत बंद आहे.

पोलिसांकडून देवस्थानाला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर मात्र भाविकांविना सुना आहे.

दरम्यान यावेळी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड, विश्वत अभय गुंजाळ, बन्सी ढोमे, सुरक्षा अधिकारी सुरेश सुपेकर, मंडळ अधिकारी पंकज जगदाळे, तलाठी फतले, उंडे, संतोष मंडगे आदी उपस्थित होते.