श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ! श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी साडेतीन वर्षे श्रीगोंद्याचे तहसीलदार म्हणून काम पाहिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची रखडलेली बदली आता झाली असून त्यांनी आठ दिवसापूर्वी आपला पदभार सोडला आहे. मात्र अद्याप श्रीगोंदा तहसीलदार पदावर अजून कुणी हजर झालेले नाही.

कारण याठिकाणी पदभार स्वीकारण्यासाठी चार, पाच तहसीलदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील काही आपण शिफारस केलेले तहसीलदार यावेत म्हणून दबाव तंत्राचा अवलंब करीत आहेत.

परिणामी हा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आहे. महेंद्र माळी हे जळगावला बदलून गेले आहेत. त्यांचा पदभार अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लवकर तहसीलदार यावेत अशी अशी जनतेमधून मागणी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, महसूलमंत्री याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24