अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील अमित राठोड, वय ३६ या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हा युवक स्वस्त धान्य दुकान चालवीत असून आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तर वडील पुणे येथे राहत आहे. प त्नी मुलांसह माहेरी गेली होती.
याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास टाकळीभान पोलिस करीत आहेत.