अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाय सुरु आहेत. विविध ठिकाणी लॉक डाऊन घोषित केलेलं आहे. परंतु याचाच फायदा काही चोरटयांनी उचलला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनई येथे लॉक डाऊन केले होते. याच काळात अर्थात 9 जुलैच्या सायंकाळी 5 ते 24 जुलै चे सकाळी 10
या काळात सोनई नवी पेठ भागातील सरकारमान्य देशी दारू दुकान फोडून 58 हजार 500 रुपये किमतीची दारू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यंकटेश रामस्वामी पालेपवार (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार देशी दारूचे दुकान अज्ञात चोरट्याने फोडून देशी दारू संत्रा 20 बॉक्स किंमत 45 हजार रुपये तसेच देशी दारू बॉबी संत्रा
6 बॉक्स किंमत 13 हजार 500 अशी 58 हजार 500 रुपयांची देशी दारू पश्चिम बाजूच्या भिंतवरील पत्रा फोडून आत प्रवेश करून चोरून नेली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com