अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : शहराच्या विकासाला गती मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांच्या कामांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तसे नियोजन केले आहे.
शहरातील जुन्या भागाबरोबरच उपनगराच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले. रासनेनगर परिसरातील रस्ता डांबरीकरण व भारतीय जनता पार्टीच्या कुटुंब संपर्क अभियानाचा शुभारंभ महापौर वाकळे यांच्या हस्ते परिपत्रक वाटून करण्यात आला.
या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज दुलम, नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, उदय कराळे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews