‘या’ तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत.

तर काही ठिकाणी गावकऱ्यांमध्ये एकी होत नसल्याने निवडणूक होणारच आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाला आहेत.

नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या 591 जागांसाठीच्या अर्ज माघारीच्या कालच्या शेवटच्या दिवशी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामध्ये खरवंडी, शिंगणापूर, मंगळापूर, मोरयाचिंचोरे,

देवसडे व वाटापूर या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी विविध गटांना उमेदवारांची माघारीसाठी मनधरणी करावी लागत होती.

तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायतीच्या 15 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या. तर एक जागा रिक्त राहिली. शनीशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सर्व 9 जागा प्रथमच बिनविरोध झाल्या.

त्याचबरोबर मोरयाचिंचोरे (9 जागा), मंगळापूर (7 जागा), देवसडे(9 जागा), वाटापूर (7 जागा) या अन्य ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या.

अहमदनगर लाईव्ह 24