अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- घरासमोर उभ्या असलेल्या महिलेचे गळ्यातील गंठण चोरट्यांनी धूमस्टाईलने चोरून नेले आहे. धक्कादायकबाब म्हणजे सदर घटना शहरातील भूतकारवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी चंपाबाई दत्तात्रय जगताप यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, घरासमोर उभ्या असलेल्या या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी ओरबाडले तेव्हा त्यातला काही भाग हा खाली जमिनीवर पडला तर उर्वरित भाग चोरट्यांनी नेला आहे. याप्रकरणी अधिक तपासा सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे करीत आहेत.
नगर शहर व जिल्ह्यात घरफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. पोलसांनी रात्रीसह दिवसाही गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.