अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-सर्वसामान्याना त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव करून देत आणि त्यांना कार्यप्रेरीत करून वंचितांची सेवा करण्याचा अनोखा आदर्श स्नेहालय परिवाराने निर्माण केला आहे.
या कार्याचा सहयोगी होण्यात एसबीआय म्युच्युअल फंड संस्थेला धन्यता वाटते, असे प्रतिपादन या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गणेसन. यांनी आज केले.
स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात आज एसबीआय म्युच्युअल फंड , यांच्या सहयोगाने उभारण्यात आलेल्या तीस किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आणि मोबाईल मेडिकल वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री एस. गणेशन उपस्थित होते. स्नेहालयच्या वंचित स्त्रिया , मुले, झोपडपट्टी, शाळा, रोजगार कौशल्य, रुग्णालय , बालमाता पुनर्वसन आणि दत्तक विधान प्रकल्प,
अत्याचारित महिलांसाठीचे स्नेहाधार आणि सखी केंद्र, समुदाय रेडिओ केंद्र रेडीओ नगर 90.4 एफएम ,आदी उपक्रमाना श्री. गणेशन यांनी भेटी दिल्या. मोबाईल मेडिकल व्हॅन मध्ये रुग्णाची तपासणी,
रक्त लघवी इत्यादी प्राथमिक तपासण्या, एक्सरे बघण्याची सुविधा, औषधे देण्यासाठी फार्मसी, सर्व प्रकारची वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यासाठी सुविधा आहेत.
त्यामुळे झोपडपट्ट्या खेडेगाव, वाड्या -वस्त्या, औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योग तसेच नगर ,राहुरी, आणि पारनेर तालुक्यातील भटके-विमुक्त दलित वस्त्या, येथे वैद्यकीय शिबिरे,
कामगारांची आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा देणे शक्य होणार आहे. यावेळी संजय गुगळे, हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, मिलिंद कुलकर्णी, संजय बंदिष्टी जयकुमार मुनोत,
डॉ. आतिश केदारी ,डॉ. पंकज गडाख, डॉ. मारसिया वॉरन, डॉ. स्वाती आणि सुहास घुले,विष्णू कांबळे, डॉ. सोनल रणसिंग, डॉ. सायली नाश्ते,
डॉ. पूजा वाघ, डॉ. पर्वणी लाड, डॉ. अभिजित वांढेकर, अनिल गावडे , भारत सेवक निक कॉक्स, जोयस कोनोलीे, आदी उपस्थित होते.