अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील उक्कडगाव परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाच्या ईयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनीची बलात्काराची घटना समोर आली असुन य मुलीची पुढील जवाबदारी स्नेहालयने घेतली आहे.
आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के रा. उक्कडगाव हा चुलत नातेवाईकच असुन याने अल्पवयीन बालिकेची संमती नसतानाही बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली. यात पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब स्नेहालयाच्या निदर्शनास आली.
स्नेहालय संस्थेच्या मदतीने पिडीत मुलीने याप्रकरणी गावातील आरोपी विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील एका गावातील १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीस आरोपीने तीची संमती नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने परिसरातील एका शेतात नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हा प्रकार दि.१४ फुेब्रवारी ते ४ जुलै २०२० या दरम्यान घडला. त्यामुळे सदरची पिडीत विद्यार्थिनी गर्भवती असून काल तिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या वेळी स्नेहालयच्या प्राची वाबळे यान्नी सातत्याने अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केले. पिडीता ही वयाने लहान असल्याने व तिला काळजी व संरक्षण तसेच वैद्यकिय मदतीची गरज असल्याने
मे. बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिला स्नेहालयात ठेवण्यात आले आहे. येथे पुढिल सर्वतोपरी बालिकेला मदत मिळणार आहे.