अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील ग्राम़ीण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लॅंटचे उदघाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ याच्या हस्ते करण्यात आले.

मात्र यावेळी झालेल्या एका घटनेने आमदार बबनराव पाचपुते चांगलेच संतापले आणि त्यांना राग अनावर झाल्याने त्यांनी तेथील कधी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

ऑक्सिजन प्लॅंटचे उदघाटन वेळी कोनशिलेवर उपस्थितीत नसणाऱ्या मंत्र्यांचे नाव वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकण्यात आले.

जे कार्यक्रमाला येणार नव्हते हे सांगूनही त्यांची नावे कोनशिलेवर का टाकली, माझ्या स्थानिक विकास निधीतून हा प्रकल्प मी मंजूर केलेला असताना माझेच नाव खाली टाकले.

हा दुजाभाव नाही का? असा प्रश्न आ.पाचपुतेंनी अधिकाऱ्यांना केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ सुनील पोखरणा यांना बोलावू़न आ.पाचपुते यांनी संताप व्यक्त केला.

या अधिकाऱ्यांविरुध्द विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही पाचपुते यांनी यावेळी दिला. दरम्यान यावेळी उपस्थित पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संतापलेल्या आ.पाचपुतेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या समोर हा प्रकार घडल्याने अधिकारीही भांबावून गेले.