म्हणून शेतकऱ्यांनी पाडले कांदा लिलाव बंद!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शेवगाव येथील बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत, ते लिलाव बंद पाडले. तसेच शेवगाव पाथर्डी रस्त्यावर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दुस-यांदा कांदयाचे लिलाव सुरु झाल्याने तेथे १८०० ते २७५० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेवगाव बाजार समितीमध्ये उत्तम प्रतीच्या कांद्याला चांगला भाव वाढून मिळत असल्याने आज ७ ते ८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. सकाळी कांद्याचे लिलाव सुरु झाले.

सध्या पाथर्डी व तिसगाव येथील कांदा मार्केट बंद असल्याने मढी परीसरातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात कांदा विक्रीसाठी येथे आणला होता.

कांद्याची प्रतवारी पाहून कांद्याला लिलावात सुमारे १८०० ते २७५० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र मढी येथिल शेतक-यांनी नगर येथील मार्केटप्रमाणे कांद्याला भाव मिळावा अशी मागणी करुन कांदा मार्केट बंद पाडले.

तसेच शेवगाव पाथर्डी रस्त्यावर येवून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अहमदनगर लाईव्ह 24