अहमदनगर बातम्या

नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल एवढे अर्ज झाले दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  नगर अर्बन बँकेच्या १८ संचालकांच्या जागेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९४ अर्ज दाखल झालेले आहेत. ३ नाव्हेंबरला दाखल अर्जांची छाननी होऊन ८ तारखेला वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाचे गुजरातमधील सुरत येथील दिनेश कटारिया यांच्या विरोधात बँक वाचवा कृती समितीला उमेदवार न देता आल्याने सत्ताधारी गटाची ही जागा बिनविरोध होणार आहे.

बँकेच्या निवडणुकीत बँक बचाव समितीच्या पॅनलचे प्रमुख भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर हे करत असून त्यांच्यात काँग्रेसचे दीप चव्हाण हेही सामील झाले आहेत.

दुसऱ्या बाजुला स्व. दिलीप गांधी प्रणित सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सुवेंद्र गांधी करत आहेत.

तर बँकेची निवडणूक पक्षविरहीत असल्याने पॅनलचे नेतृत्व करत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दीप चव्हाण यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office