अहमदनगर बातम्या

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाद्वारे नगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना मिळणार रोजगार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून नगर जिल्ह्यातून १ हजार ७०१ जागांसाठी २ हजार ६८० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील जवळपास१ हजार ७०१ उमेदवारांना योजनादूत होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

राज्यभरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून १ लाखाहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

त्यानुसार जिल्ह्यात जवळपास १ हजार ७०१ योजनादूत नियुक्त होण्याची शक्यता आहे. नियुक्त झाल्यानंतर संबंधित योजनादुतांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवावी लागणार आहे.

दरम्यान, या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वर्षे वयोगटातील पदवीधर, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, संगणक ज्ञान असावे.

तसेच उमेदवारांकडे स्मार्ट फोन आणि आधारसंलग्न बँक खाते असणे देखील आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

Ahmednagarlive24 Office