अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळेे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या १ हजार ३६ आता झाली आहे. दिवसभरात ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात शनिवारी १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे.
शुक्रवार सायंकाळी सहा वाजेपासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ११६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०८० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३० आणि अँटीजेन चाचणीत ५७ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १६, अकोले २, कोपरगाव १, नेवासे ३, पारनेर ४, पाथर्डी २ अशा रुग्णांचा समावेश आहे.