अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १ हजार ८२ झाली आहे. दिवसभरात नवे १३० रुग्ण आढळून आले, तर ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार १५२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ९२१ आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३३, खासगी प्रयोगशाळेत ५१ आणि अँटीजेन चाचणीत ४६ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील २, अकोले ८, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३, नेवासे १, संगमनेर १, शेवगाव १, श्रीगोंदे ५ आणि इतर जिल्ह्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा १३, अकोले २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ६, नेवासे २, पारनेर २ पाथर्डी १, राहाता २, राहुरी १, संगमनेर १२, शेवगाव २, श्रीगोंदे ३ आणि श्रीरामपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा ३,
जामखेड ४, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ५, नेवासे ३, पारनेर ५, पाथर्डी १, राहाता ४, संगमनेर ८, शेवगाव ३, श्रीगोंदे ४ आणि श्रीरामपूर ३ रुग्णांचा समावेश आहे.