अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नगर येथील निवासस्थानी उपचार सुरु आहेत.
विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पाथर्डी येथील करोना सेंटर येथे तपासणीसाठी स्त्राव देण्यात आले.
शनिवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. आमदार मोनिका राजळे यांच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आमदार मोनिका राजळे यांची प्रकृती सध्या स्थिर असून, अहमदनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्या उपचार घेत आहेत. आ.राजळे ह्या कोरोना बाधित झाल्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात त्या सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved