अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- आंतर जिल्हा बदल्या अंतर्गत 10 ते 12 जिल्ह्यांतून 62 शिक्षक अहमदनगर जिल्ह्यात बदलून आले तर जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून 41 शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात बदलून गेले आहेत.
राज्य पातळीवरून या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे लेखी आदेशाशिवाय जिल्ह्यातून बाहेर बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत.
न्यायालयाने आदेश दिलेल्या शिक्षकांना आधी नेमणुका दिल्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आणि त्यानंतर रिक्त राहणार्या जागांवर बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या
आंतरजिल्हा शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हांतर्गत बदल्यांची सद्यस्थती अंधारमय दिसत आहे.
ग्रामविकास विभागाने आधी 31 जुलैपर्यंत आणि त्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आला असून सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील आजारी असल्याने रजेवर आहेत. ते आल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करावयाच्या की नाही, याबाबत निर्णय होणार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved