कर्जत : तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. परंतु खबरदारी म्हणून आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय व नगर पंचायत यांनी पोलिसांच्या मदतीने तयारी केली आहे.
तालुका आरोग्य विभागात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्रांतर्गत एकूण ३८१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात १२ वैद्यकीय अधिकारी, १५४ आरोग्य कर्मचारी व २१५ आशा सेविका आहेत.
सर्व कर्मचारी स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाची व समाजाची काळजी घेत आहेत. तालुक्यात करोना किंवा सारीचा रुग्ण आढळल्यास तो शोधण्यास मदत होईल व तालुक्यातील जनतेचे आरोग्य अबाधित राहील, या दृष्टीने सर्व आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.
आता पर्यंत २३७९५६ लोकांचे सर्वेक्षण झाले आहे. आता पर्यंत २ सारी सदृश रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणी साठी पाठवले आहेत. आरोग्य विभागाने पूर्वतयारी चा एक भाग म्हणून तालुक्यातील ३ केंद्र कोव्हिड केअर सेंटर म्हणून तयार ठेवले आहेत.
तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे कोव्हिड हेल्थ समर्पित सेंटरची निर्मिती केली आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या, परगावतून आलेल्या तसेच करोना बाधित क्षेत्रातून आलेल्या एकूण १२१३३ नागरिकांच्या हातांवर आरोग्य विभागाने होम क्वारंन्टाईनचे शिक्के मारले आहेत.
आतापर्यंत परदेशातून आलेल्या एकूण ४० लोकांना होम कोरोन्टाईन केले गेले आहे व एका व्यक्तीला आरोग्य विभागाच्या निगराणीत क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला आपल्या घरीच राहण्याबाबत,
घराबाहेर न निघाण्याबाबत, मास्क वापरण्याबाबत व सोशल डिसस्टनसिंग पाळण्याबाबत सातत्याने आवाहन ही करण्यात येत आहे असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.