अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- अशदायी पेन्शन योजनेेबाबत शासन जो आदेश काढलेला आहे. त्या विरोधात 31 तारखेला काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कार्यालय मंत्री सुनील पंडित यांनी दिली. तसेच राज्यभर शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रेशीम बाग, नागपूर येथे नुकतीच राज्य शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच झाली.
यावेळी सभेत संघटनात्मक आढावा तसेच आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. सरकारने अंशदायी पेन्शनबाबत काढलेला आदेश मागे न घेतल्यास 7 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पंडित म्हणाले कि, या सभेत कोकण,
नागपूर, मराठवाडा विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक तसेच नाशिक व अमरावती विधान परिषद पदवीधर मतदार संघाचा आढावा घेऊन मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले आहे.