अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- आजवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असल्याच्या आपण पहिल्या आहेत. मात्र आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या देखील अनेक तक्रारी येत आहेत.
अशाच प्राथमिक शाळेत शिक्षक सतत वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या कारणामुळे ग्रामस्थांनी शाळेच्या वर्गाला टाळे ठोकले. ही घटना पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी या गावात घडली.
या गावातील शाळा ही तीन शिक्षकांची शाळा आहे. मात्र शाळेत एकच शिक्षक येतो ते पण उशिरा, हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर शनिवारी सकाळी गावातील ग्रामस्थ व पालकांचा संतापाचा उद्रेक होऊन सुमारे दोन तास शाळा बंद ठेवली.
वर्गाला टाळे ठोकून उपस्थित एका शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलेच सुनावले. शनिवार सकाळी शाळा होती .नऊ वाजेपर्यंत एक हि शिक्षक हजर नव्हता. हे शिक्षक हॉटेलमध्ये गप्पा मारत बसतात. एक शिक्षक स्वतःची खासगी शिकवणी शिकवत बसले होते. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कोणी पाहत नाही.
या प्रवृत्ती मुळे ग्रामीण भागातील शाळा मोडकळीस आल्या विद्यार्थी संख्या ही घटत आहे.त्यामुळे जिरेवाडी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले .
कोरोना काळात एकही दिवस हजर नाही .शाळा सोडल्याचे दाखले घेण्यासाठी नागरिकांना माराव्या लागतात. गटशिक्षण अधिकारी आठ दिवसापूर्वी शाळेत आले होते.एक ही शिक्षक शाळेवर हजर नव्हते . प्राथमिक शिक्षकाने स्वतःचे खासगी क्लास चालू केले आहेत.