अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : म्हणून अहमदनगरचा आमदार निधी घटला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (आमदारनिधी) आमदारांना मिळणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यासाठी प्रत्येक आमदरांना प्रत्येकी २८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

मात्र, अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला यावेळी पूर्वीपेक्षा कमी निधी आला आहे. याचे कारण म्हणजे नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघातील आमदार अरुण जगताप यांची मुदत संपली आहे.

त्यामुळे ते वगळून इतर आमदारांनाच निधी देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यांची मुदत संपल्याने विधान परिषदेची मतदारसंख्या घटली.

त्यामुळे जगताप यांच्या जागेसाठीची निवडणूकही रखडली आहे. एक आमदार कमी झाल्याने निधीही कमी प्रमाणात उपलब्ध झाला आहे. राज्य सरकारने आता आमदार निधीची मर्यादा वाढविली आहे.

त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्यात १४६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६० टक्के निधी वितरित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागाला आहेत. त्यातून दरमहा सात टक्के निधी दिला जातो. त्यानुसार एप्रिल महिन्यासाठी प्रत्येकी २८ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office