… तर धनगर समज आक्रमक होणार; मंत्री थोरातांसह अन्य मंत्र्यांच्या घरावर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे.

परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. नुकतेच अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने निदर्शने करत आरक्षण देण्याची मागणी केली होती.

आता धनगर समाजाच्या आरक्षणाची दखल राज्यसरकारने न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरावर मेंढ्याचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने विजयराव तमनर यांनी राज्य सरकारला दिला आहे. धनगर समाजाच्यावतीने राहुरीत ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी तमनर बोलत होते. राहुरी तहसील कार्यालयावर धनगरी वेशामध्ये काठी व घोंगडी घेऊन धनगरी वेशात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. येळ कोट-येळकोट जय मल्हार, ढोल बजाव सरकार जगाव या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला.

तमनर म्हणाले, येत्या काही दिवसांत राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने जिल्ह्यातील मंत्र्यांच्या घरावर मेंढराचा मोर्चा काढण्यात येईल व त्यांना आरक्षणाचा जाब विचारला जाईल. या आंदोलनाला वैशालीताई नान्नोर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे ज्ञानदेव बाचकर,

दत्ताभाऊ खेडेकर, भारत मतकर, दादाभाऊ तमनर, सखाराम तमनर आदींसह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाने निदर्शने करत आरक्षण देण्याची मागणी केली होती.

यावेळी राज्य सरकारने विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत, अशी केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आदेश काढून आरक्षण द्यावे किंवा राष्ट्रपती महोदयांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे.

महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या ६५ वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करत आहे, तरी त्याची रिट पिटीशन उच्च न्यायालयात चालू असून राज्य सरकारच्या वतीने फास्ट ट्रॅक कोर्टात ही रिट पिटीशन चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा आदी मागण्या केल्या होत्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24