अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. अन पुन्हा एकदा या कामामध्ये शिक्षकांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात हे काम प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आलेले असून शाळा सुरू झाल्या तरी त्यांच्या कोविड ड्युट्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत.
नगर जिल्ह्यात 15 नागरिक परदेशातून आलेले असून यात नगर महापालिका 2, कोपरगाव 2, राहाता आणि राहुरी प्रत्येकी 3, संगमनेर 1 आणि श्रीरामपुरातील 4 जणांचा समावेश आहे.
परदेशातून आलेल्या या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांचा स्त्राव नमुना घेण्यासाठी त्यांना रुग्णालय घेवून जाण्याची जबाबदारी तालुका पातळीवर प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आलेली आहे.
तसेच स्त्राव नमुना घेतल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षापर्यंत याच शिक्षकांना घेवून जायचे आहेत. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही कोविड ड्युटी शिक्षकांची धोक्याची झाली असून
हेच शिक्षक पुन्हा शाळेत जावून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देणार आहेत. यामुळे शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोविडचा धोका वाढला आहे.