अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुण्याकडे जाण्याचा प्लॅन आखला असेल त्यापूर्वी हि बातमी नक्की वाचा कारण काही वाहतुकीच्या मार्गात काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.(Pune-Ahmednagar highway)
1 जानेवारी 2022 रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त 31 डिसेंबर सायंकाळी सात वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत नगर – पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
दरम्यान याबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी काढले आहे. याशिवाय अभिवादनासाठी येणार्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासांसाठी वळविण्यात येणार आहे.
जाणून घ्या कशी असणार आहे वाहतूक-
1) पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहतूक खराडी बायपास मार्गे केडगाव – चौफुली – न्हवरा – शिरूर मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे.
2) सोलापूरहून चाकण कडे जाणारी वाहतूक खराडी बायपास मार्ग विश्रांतवाडी – आळंदी – चाकण मार्गे वळविण्यात येणार आहे.
3) मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव आळेफाटा – नगर
4) मुंबई हून नगरकडे जाणारी जड वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूर मार्गे नगर येथे वळविण्यात येणार आहे.