अहमदनगर बातम्या

…म्हणून त्यांनी चक्क तहसील कार्यालयासमोर घातले ‘जागरण गोंधळ’…! आठ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास दिला ‘हा’इशारा..?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News:आज शेतकरी नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याची विविध प्रकारे अडवणूक केली जात आहे. याकडे सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्याकरिता तसेच निष्क्रिय राज्यकर्ते, कारखानदार तसेच तालुक्यातील अतिशहाणे निष्क्रिय मुजोर अधिकाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर आणून,त्यांना योग्य सद्बुद्धी द्यावी यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

शेतीपंपाची सक्तीची वीज बिल वसुली बंद करावी.ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान ३१०० रुपये द्यावा.

पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी.लंपी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी.जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करण्यात यावे.

या सर्व मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत अनोखे आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार महावितरणचे सर्व अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून,

या प्रश्नांसंदर्भात लवकरच आढावा बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. दरम्यान शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर संबंधित कार्यालयात गाढवं सोडून आंदोलन करण्याचा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office