अहमदनगर बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत समाजसेवक आण्णा हजारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन चिघळत चालले आहे. दरम्यान याचेच पडसाद नगर जिल्ह्यात देखील उमटत आहे. याच आंदोलनात आता समाजसेवा आण्णा हजारे यांनी एन्ट्री केली आहे.

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकतेच एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एस.टी.कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एस. टी. कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत.

मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने पारनेर येथील एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे येऊन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेत आपल्या समस्या हजारे यांच्या जवळ मांडल्या.

यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना हजारे यांनी सांगितले की, कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते आंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते.

त्यासाठी सर्वांनी एकत्रित येत राज्य सरकारवर दबावशक्ती निर्माण करावी. तसेच गेल्या १७ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरु राहू द्या.

आंदोलन करत असताना कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी सर्व आंदोलकांनी घेतली पाहिजे. असा सल्लाही अण्णांनी यावेळी आंदोलकांना दिला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office