मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे.
त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाल्याचे मोठे समाधान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव मतदारसंघातील कायम स्वरूपी दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव येथील पाझर तलाव, बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी स्वतः जातीने उभे राहून आ. आशुतोष काळे यांनी हे बंधारे निळवंडेच्या डाव्या कालव्यातून भरून देण्यासाठी पाठपुरावा केला.
त्यामुळे या गावांची पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण दूर झाली आहे. त्याबद्दल या गावातील नागरिकांनी आ. काळे यांच्या हस्ते जलपूजन करून त्यांचा जाहीर सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी बंधाऱ्यात कसे आले ओढे, नाले कसे भरले हे जनतेला माहित आहे. मात्र ज्यांचे यासाठी कोणतेही योगदान नाही, ते मात्र काहीही न करता भाषण ठोकून नेहमीप्रमाणे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनता मात्र सुज्ञ आहे.
यावेळी सुनील शिंदे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, किसन पाडेकर, बाबुराव थोरात, गजानन मते, बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, वेसच्या सरपंच जया माळी, अंजनापूरच्या सरपंच कविता गव्हाणे, नंदकिशोर औताडे,
कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, युवराज गांगवे, रंगनाथ गव्हाणे, चांगदेव शिंदे, ज्ञानेश्वर गव्हाणे, कृष्णा गव्हाणे, निवृत्ती गव्हाणे, संतोष वर्षे, अशोक गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, रवींद्र वर्षे, विजय कोटकर, संतोष गव्हाणे, अमोल पाडेकर, नानासाहेब नेहे, रामनाथ पाडेकर, लहानू गव्हाणे, गोकुळ पाचोरे, रामनाथ थोरात, भास्कर महाराज गव्हाणे, अक्षय गव्हाणे, संपत खालकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.