अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात काम करताना चांगले अनुभव आले. माझ्या छोट्या कारकिर्दीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल झाली, अशी माहिती मावळते पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली.
राज्य सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी सिंह यांच्या बदलीचा आदेश काढला. यानिमित्त स्नेहबंध फाउंडेशन तर्फे सिंह यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. अखिलेश कुमार सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अहमदनगर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले होते.
खून, दरोडे, दरोड्याच्या तयारीत असलेले टोळी अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांचे स्थानिक पोलिसांना नेहमी मार्गदर्शन असायचे.
त्यांचा पूर्ण कार्यकाल लॉकडाऊन व कोरोनाचा बंदोबस्तामध्येच गेला. त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल स्नेहबंधचे फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी पुस्तक देऊन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अखिलेश कुमार सिंह यांनी २ एप्रिल रोजी नगरचा पदभार घेतला होता. यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगरचे नूतन पोलीस अधीक्षक असतील.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved