अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- राजकारणातील बड्या बड्या नेतेमंडळीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्या हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
यामुळे सध्या राजकारणातील राजकरण ढवळून निघाले आहे. नुकतेच सोमय्या यांनी मुश्रिफांचा तिसरा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत.
त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय.
आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.
तर दुसरीकडे सोमय्या यांनी उद्या हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सोमय्या उद्या मुश्रीफांवर कोणता आरोप करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.