अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात…वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे काही पुढारी खंडणी गोळा करत असल्याचा आरोप आ.कानडे यांनी केला आहे.
यावेळी आ. कानडे यांनी भाजपनेते राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कानडे म्हणाले कि, काँग्रेसमध्ये त्यांना मानसन्मान होता,
त्यांनी सत्तेत भरपेट खावून भरधाव धावणाऱ्या भगव्या अश्वाला पाहुन तेही पळाले पण त्यांना भगव्या वातावरणात किती मान सन्मान मिळतो हे आज दिसत असल्याची टीकाही आ.कानडे यांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
महसुलमंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण कार्यकर्त्यांचा मेळावा देवळाली प्रवरात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृष्णा मुसमाडे हे होते.
त्यावेळी आ.कानडे बोलत होते. यावेळी भाजपाचे काही पुढारी वर्गणी गोळा करण्याऐवजी खंडणी गोळा करीत आहे. जर कोणी वर्गणी दिली नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.
भावनात्मक लाटा तयार करुन सत्ता काबीज करण्याचा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे. असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे