अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सोनई हे गाव हॉटस्पॉट घोषित केले आहे. मात्र असे असतानाही येथील किराणा दुकानातून सामान विकणारा व्यावसायिक,
ग्राहक आणि त्याचबरोबर विनाकारण दुचाकीवरून फिरणारे तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध सोनई पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पोलीस प्रशासनाचा सोनईत हॉटस्पॉट जाहीर असतानाही दि . १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता सोनई येथील मुख्य पेठेत किराणा दुकान चालविल्याप्रकरणी किशोर शांतिलाल भळगट {रा. सोनई} तसेच सचिन रामेश्वर कांबळे,
[रा. लोहगाव रोड, सोनई] या किराणा दुकानात जाऊन किराणा माल खरेदी करणे आणि हॉटस्पॉट पॉकेट क्षेत्रात मुक्तपणे संचार करून
पोलीस प्रशासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस कर्मचारी सचिन कारभारी ठोंबरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.
या फिर्यादीनुसार किराणा दुकानदार किशोर शांतिलाल भळगट आणि ग्राहक सचिन रामेश्वर कांबळे [रा. लोहगाव रोड, सोनई] या दोघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात
भादंवि कलम १८८, २६९, २७० साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २ आणि ३ तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) प्रमाणे २२७ \ २०२० क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच सोनई हॉटस्पॉट पॉकेट प्रतिबंधक क्षेत्र घोषित असताना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशाचा भंग करून दुचाकीवर विनाकारण फिरत असल्याप्रकरणी महादेव शिवाजी जाधव [रा. सोनई एमएच १७ बी. आर. ९७३७]
सागर शिवाजी कुर्हे [रा. राघू हिवरे ता. पाथर्डी (एमएच १६ बी. के. १२६३) मंगेश मधुकर गुंजाळ [रा. वांबोरी ता. राहुरी] यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, विना नंबरची पल्सर ही दुचाकी सोनई येथील आंबेडकर चौकात मिळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यामुळे तीनही आरोपींविरुद्ध भादंवि कलम १८८, २६९, २७० साथ रोग प्रतिबंधक कायदा कलम २ आणि ३ तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) नुसार ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ मुळे यांनी फिर्याद दिली होती. गुन्ह्यात वापरलेल्या तिन्ही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews