अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. या वाढत्या संक्रमणाच्या आकडेवारीने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
अहमदनगरमधील बाधितांच्या संख्येने आठशेचा टप्पा पार केला आहे. रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन दिवसात नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी होत नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमांच्या बाबतीत कडक पाऊले उचलली आहेत.
जिल्ह्याच्या बाहेरील कोणी नगर जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणीही कडक करण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये ये-जा कोणी करणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे.
करोनाचा फैलाव वेगाने होऊ नये, यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याच्या कामाला गती देण्यात आली असून लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या स्त्राव नमुना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews