भगवान गडावर पहिल्यांदाच झाले असे काही ….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रथमच श्रीक्षेत्र भगवान गडावर शातंता होती. आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाणारा भाविक भगवानगडावर जात विजयी पांडुरंगाचे दर्शन घेत समाधान मानत असे.

मात्र, या वर्षी सर्व परंपरा खंडित होत आहे. देशात कोरोनाने कहर केल्यानतंर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळ बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

श्रीक्षेत्र भगवानगडावरील श्रीसंत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन व गडावरील अन्नछत्रालय अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आले.

दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो वारकरी व भाविक श्रीक्षेत्र भगवानगडावर संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकाची गर्दी असते. तसेच या ठिकाणी देवस्थानच्या वतीने मोफत अन्नछत्रालय चालू असते.

या वर्षी मात्र शासनाने केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने शासकीय सामाजिक, धार्मिक, सामुदायिक कार्यक्रमावर बंदी घातली असल्याने

भगवानगड देवस्थानाकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. भगवानगडाने पैठण व त्यानंतर पढंरपूरला जाणारा पालखी सोहळा रद्द केला. वार्षिक फिरता नारळी सप्ताह रद्द केला.

आता गडावरील दर्शन, तसेच गडावरील अन्नदान तात्पुरते बंद केले असल्याने गडावर मासिक अन्नदान करणाऱ्या ग्रामस्थांनी पुढील सूचना येईपर्यंत गडावर देण्यासाठी भाकरी बनवू नयेत.

शिवाय ‘कोरोना विषाणू’ हा जीवघेणा विषाणू असल्याने सर्व भाविकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24