सरकारी जागा हडप करणाऱ्यांना करणार ‘असे’ काही ; आ. कानडे म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-केंद्र सरकारचे कृषिविधेयक शेतकरी विरोधात असल्यचाह आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी टाकळीभान येथे शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

याचे उदघाटन आ. कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मी प्रथम जनतेचा सेवक आहे. सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी सरकारी जागा हडप केल्या त्यांना मी त्या पचवू देणार नाही, असा परखड इशारा त्यांनी दिला.

यावेळी आ. कानडे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आ. कानडे म्हणाले , केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकर्‍यांविरोधी काळे कायदे करून शेतकर्‍यांचे सर्व आधिकार या सरकारने हिरावून घेतले आहेत.

काँग्रेस पक्षाने शेतकरी विरोधी भूमिका घेतलेल्या केंद्रातील सरकारचा निषेध नोंदवत केंद्राने केलेले कायदे रद्द करावेत म्हणून राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे. राज्यात या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी जिल्ह्यातील भाजपाच्या मुख्य नेत्यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रखर टीका केली. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, विष्णूपंत खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, जि. प.गटनेते अ‍ॅड. सर्जेराव कापसे, संग्राम कानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24