मुलीचे अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या ‘त्या’ तिघांसोबत झाले असे काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करण्यात आरोपीला मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला १७ ऑक्टोबर रोजी घरातून पळवून नेण्यात आले. आरोपीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या वडिलांसह काही ग्रामस्थांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाणे गाठत ठिय्या मांडला.

यावेळी भाजपचे प्रकाश चित्ते, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सुनील मुथा, पंचायत समिती सदस्य डॉ. वंदना मुरकुटे, शिवसेनेचे सचिन बदधे आदींनीही पोलिस निरीक्षक मसूद खान व उपअधीक्षक राहुल मदने यांच्याशी चर्चा करून लवकर तपास करावा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीला पळवून नेणाऱ्या मोहसीन सय्यद या आरोपीला मदत करणाऱ्या सागर, गणेश व रियाज या त्याच्या मित्रांना पकडले. या तिघांनी या मुलीने नदीत आत्महत्या केली, अ

सा भासवण्याचा प्लॅन केला होता. तिची चप्पल व ओढणी नदीकाठी नेऊन ठेवली होती. पोलिसांनी वेळीच या तिघांना पकडले. त्यांच्याकडून मोबाइल ताब्यात घेतला. त्यावरून पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस केले असूून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24