Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना जामखेड तालुकूयात घडली आहे. मोठ्या परिश्रमाने पिकवलेला कांदा मार्केटमध्ये विक्री करून कांद्याच्या पट्टीचे पैसे आपल्या गावी जाणाऱ्या शेतकऱ्याला भरदिवसा लुटण्याची घटना घडली आहे.
दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी या शेतकर्याची मोटारसायकल अडवुन, त्याला दगडाने मारहाण करत त्यांच्या जवळील १ लाख ६० हजार रुपयांना लुटले.
ही घटना जामखेड तालुक्यातील जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ सोमवारी भरदिवसा घडली. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नान्नज येथील शेतकरी विकास दत्तु मलंगणेर यांनी पंधरा दिवसापुर्वी शेतातील काढलेला कांदा जामखेड येथील एका ट्रेडर्सच्या दुकानात घातला होता.
यानंतर शेतकरी विकास मलंगणेर हे सोमवारी या कांद्याचे पैसै आनण्यासाठी जामखेड येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदार अशोक महादेव मोहळकर हे देखील होते. मलंगणेर यांनी कांद्याच्या पट्टीचे १ लाख ६० हजार रुपये घेऊन शर्टच्या आतील भागात ठेऊन ते जोडीदारासोबत मोटारसायकलवर नान्नज गावी चालले होते.
याच दरम्यान पाळत ठेऊन असलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या दोन मोटारसायकलवरून या शेतकर्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी हे शेतकरी जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याच्यावर आले असता, यातील चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल अडवली व या दोघांना दगडाने मारहाण करत त्यांच्या जवळ असलेले १ लाख ६० हजार रुपये व ४ हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण १ लाख ६४ हजारांचा ऐवज घेऊन मोटारसायकलवरून पळुन गेले.
यात विकास दत्तु मलंगणेर व अशोक महादेव मोहळकर हे दोघेही जखमी झाले. याबाबत विकास मलंगणेर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गौतम तायडे हे