कोरोना बाधीत रुग्णाकडून एक लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास होणार असे काही …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांकडून उपचारा पोटी आकारण्यात येणाऱ्या बिलाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या बिलाची प्रथमतः नेमणूक करण्यात आलेल्या भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच तपासणी अंती निश्चित होणारी बिलाची रक्कम संबंधित रुग्णालयास देण्यात यावी, असे आदेश आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोविड बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना,

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ इत्यादी बाबतची तपासणी करणे कामी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहेत.जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकडून बिलापोटी शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेपेक्षा जास्त दर आकारले जात असल्या

बाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या.त्यामुळे कोविड बाधित रुग्णांचे रुपये 1 लाख पेक्षा जास्त रकमेच्या बिलांची भरारी पथकाद्वारे तपासणी करणे आवश्यक असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. साथरोग अधिनियम 1897 अन्वय निर्गमित करण्यात आलेली

अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिका रानुसार हे आदेश जारी करण्यात आले. भरारी पथक बिलांची तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदार तथा घटना व्यवस्थापन यांचेकडे सादर करतील.

तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी भरारी पथकाने द्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेऊन अहवाल दर सोमवारी या कार्यालयास सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24