Ahmednagar News : आईला धार्मिक कार्यक्रमाला सोडून परतताना भीषण अपघात, मुलगा ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :  अहमदनगरमधील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आता पुन्हा एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातामध्ये 18 वर्षीय तरुण ठार झाला आहे. वैभव उर्फ महेश नागेश होळकर असं मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

तो आपल्या आईला धार्मिक कार्यक्रमस्थळी सोडून घराकडे परतत होता. ही घटना बीड- अहमदनगर महामार्गावरील कडा परिसरात घडली असून मुलाची अवस्था पाहून आईने एकच आक्रोश केला होता.

अधिक माहिती अशी : बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे संत बाळूमामांच्या मेंढ्या आलेल्या असून याठिकाणी मोठा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी महेश होळकर हा तरुण रात्रीच्या वेळी आईला दुचाकीवर घेऊन कार्यक्रम ठिकाणी गेला व आईला तिथे सोडून तो परत घराकडे येत होता.

माघे घराकडं परतत असताना कडा परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. ज्यावेळी ही घटना समजली तेव्हा आईने टाहो फोडला. या घटनेने कडा गावासह परिसरात शोककळा पसरली होती.