अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने रब्बीच्या पेरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 28 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून यात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारी पिकाचे 1 लाख 82 हजार हेक्टर आहे. झालेल्या एकूण पेरणीची टक्केवारी 32 टक्के असून यावरून यंदा ज्वारीचे नियोजित क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी हंगामात ज्वारी हे प्रमुख पीक असून त्याचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 77 हजार आहे. यासह गहू आणि हरभरा पीक देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून थंडी गायब झाल्याने गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात आतपर्यंत 8 हजार 640 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून 31 हजार 662 क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे.
जिल्ह्यात ऊस पिकाची लागवडीचे क्षेत्र 41 हजार हेक्टरच्या पुढे गेले असून चारा पिकांचे क्षेत्र देखील 22 हजारांच्या जवळपास झाले आहे. कांदा पिकाची लागवड देखील विक्रमी झाली असून सध्या 55 हजार 313 कांदा पिक आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved