अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महानगरपालिकेमध्ये सध्या स्वीकृत नगरसेवकपदाची धूम वाजत आहे. त्यासाठी तिन्ही मातब्बर पक्ष चाखचोळा घेत आहेत. मागे एकदा स्वीकृत नगरसेवकपद निवडीसाठी सभा बोलविण्यात आली होती.
मात्र गटनेत्यांनी सुचविलेल्या नावांचे अर्ज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बाद ठरविले होते. त्यामुळे आता पुन्हा सभा बोलविण्यात आली आहे.
महापालिकेतील संख्याबळानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी दोन आणि भाजपचा एक असे पाच सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी शिवसेनेने जुनीच नावे दिली असून राष्ट्रवादीने एक व्यावसायिक तर दुसरा सावेडी उपनगरातील नाव तर भाजपात जुन्या रामदास आंधळे यांच्या नावाची चर्चा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी अखेर मुहूर्त सापडला असून, आज गुरूवारी (दि.१ ऑक्टोबर) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गतवेळी दिलेले विपुल शेटिया यांचेच नाव पुन्हा देण्यात आले असून दुसरे नाव हे नागापूर-बोल्हेगाव परिसरातील असल्याचे समजते. एका वकिलाला राष्ट्रवादीने पसंती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. हे वकिल बोल्हेगावचे वतनदार आहेत. असे बोलले जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved