जिल्ह्यातील ‘या’ पालखीचे मंगळवारी एस.टी.बसने होणार प्रस्थान!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या देखील जाणार नाहीत. केवळ मानाच्या दिंड्यातील मोजक्या लोकांना परवानगी दिली आहे.

त्यानुसार नगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे एस.टी. बसने ३० जून रोजी प्रस्थान होणार आहे.

मंगळवारी सकाळी ८ वाजता निळोबाराय महाराज मंदिराच्या प्रांगणातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, आमदार निलेश लंके यांच्या हस्ते निळोबाराय महाराजांच्या समाधीचे व पादुकांचे पूजन करून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

एस.टी. बसने पालखी सोबत २० जण जाणार आहेत. या सर्वांची कोरोना टेस्ट करून घेतली जाणार आहे.

त्यांनतरच त्यांना प्रवेश मिळणार आहे. पालखी सोहळ्याबरोबर एक पोलीस अधिकारी, वाहन व्यवस्था राहणार आहे. ३० जून रात्री अकरा वाजेपर्यत पंढरपूरमध्ये पोहोचणे बंधनकारक आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24