राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अहमदनगर मध्ये आले आणि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक नगरला भेट दिली. परंतु ही भेट केवळ ५ मिनिटांची ठरली.

त्यांनी या वेळेत नगरच्या कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली व सविस्तर अहवाल मागवून घेत लगेच पुण्याकडे प्रयाण केले. गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फडणवीस हे औरंगाबादहून पुण्याला जात निघाले असताना

नगरच्या शासकीय विश्रामगृहा समोर थांबले. यावेळी निवडक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड, भैया गंधे, युवराज पोटे, सचिन पारखी, बाबा सानप यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी त्यांनी बेरड यांच्याकडून नगरच्या कोरोनाची परिस्थिती समजावून घेतली. यावेळी बेरड यांनी नगर जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणी दाखल असणाऱ्या रुग्ण,

कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांची माहिती फडणवीस यांना सांगितली. यााबाबत सविस्तर माहिती मागावून घेत असल्याचे सांगत ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24